महाराष्ट्र प्रधान मंत्री विश्वकर्मा योजना
2023 | Pradhan Mantri Vishwakarma Yojana 2023
नमस्कार मित्रांनो , मी दिलीप आत्राम
ह्या मराठी टेक सी एस सी ब्लॉग वरती आपले स्वागत करतो . आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत कि, प्रधान मंत्री विश्वकर्मा
योजना काय आहे . त्याची वैशिष्ट काय आहेत . ही योजना कोणत्या घटकाला पात्र ठरू शकते
ह्या मध्ये कोण कोण कारागिल पात्र ठरतात . त्याची फायदे कोण कोणती ह्या विषयी संपूर्ण
माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत .
प्रधान मंत्री विश्वकर्मा योजन काय आहे ?
15 ऑगस्ट रोजी भारताचे पंतप्रधान नरेदर मोदी यांनी त्यांच्या भाषणात
विश्वकर्मा योजनेचा उल्लेख केला . विश्वकर्मा योजनेच्या मदतीने भारतात राहणाऱ्या विश्वकर्मा
समाजातील लोकांना या योजनेचा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ह्या समाजात
लोहरपासून धोबीपर्यंत 140 जातींचा समावेश आहे .
महाराष्ट्र हे देखील मोठ्या लोकसंखेचे मोठे राज्य आहे . ज्यामध्ये विविध
जातींच्या लोकांचा समावेश आहे . महाराष्ट्रातिल विश्वकर्मा समाजातील लोक पारंपरिक कारागिल
आणि इतर हस्तकला करतात. ही योजना भारत सरकारने विश्वकर्मा लोकांना त्यांच्या कार्यात
प्रोत्साहन देण्यासाठी हे योजना सुरू केली आहे.
18 प्रकारच्या पारंपरिक करगिरांना
व्यवसायासाठी व्यवसाय प्रशिक्षण, आर्थिक मदत व प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाद्वारे
ही योजन सुरू करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रधान मंत्री विश्वकर्मा योजना 2023 | Pradhan Mantri Vishwakarma Yojana 2023
योजनेचा उद्देश काय आहे .
योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी
ह्या करागिरांना 5 टक्के व्याजदारसह 1 लाख रु. पहिल्या टप्प्यात तर 2 लाख रु. चे कर्ज
दुसऱ्या टप्प्यात उपलब्ध करून दिल्या जाईल.
योजनेचे वैशिष्ठ काय आणि त्याचे फायदे काय ह्या विषयी आपण जाणून घेणार आहोत.
जे 18 प्रकारचे करागिर आहेत त्यांनी
नोंदणी केल्या नंतर त्यांना पाच ते पंधरा दिवस प्रशिक्षण दिले जाणार आहेत.
पाच दिवस हे बेसिक प्रशिक्षण असून
पंधरा दिवस हे पूर्ण प्रशिक्षण दिले जाईल.
ह्या कालावधीत ह्या करगिरांना
विद्यावेतन म्हणून प्रत्येकी 500 रु रोज दिले
जाणार आहे .
प्रशिक्षण पूर्ण केल्या नंतर प्रधान
मंत्री विश्वकर्मा योजनेचे प्रमाण पत्र सोबत आयडी कार्ड देखील प्रदान केले जाणार आहेत.
आणि जे कारागिल प्रशिक्षण पूर्ण
करतील अशा कारागिलांना टूल किट खरेदी साठी 15 हजार रुपयाचे ए व्हाउचर मिळेल .
तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी
5 % व्याजदारसह पहिल्या टप्प्यात एक लाख तर
दुसऱ्या टप्यात दोन लाख रुपयांचे उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
महाराष्ट्र प्रधान मंत्री विश्वकर्मा योजना 2023 | Pradhan Mantri Vishwakarma Yojana 2023
या योजनेसाठी कोण कोण पात्र आहेत.
सुतार
लोहार
सोनार
कुंभार
न्हावी
माळी
धोबी
शिंपी
गवंडी
चर्मकार
अस्त्रकार
बोट बांधणारे
अवजार बनवणारे
खेळणी बनवणारे
कुलुप बनवणारे
विणकर कामगार
महाराष्ट्र प्रधान मंत्री विश्वकर्मा योजना 2023 | Pradhan Mantri Vishwakarma Yojana 2023
वरील सर्व करागिर या योजणेसाठी पात्र आहेत.
अर्ज नोंदविण्यासाठी कोण कोणती कागदपत्रे लागतील
1 आधार कार्ड
2 बँक पासबूक
3 मोबाईल क्रमांक
ही नोंदणी csc च्या माध्यमातून होऊ शकते त्यासाठी नजीकच्या
केंद्राला भेट देऊन नोंदणी करू शकता .
हा लेख आपल्याला आवडल्यास नक्की आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद .

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया ह्याला official वेबसाईट मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक ह्यांसारखी कोणतेही वैयक्तिक माहिती टाकू नका . आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजने बद्दल इंकवायरि किंवा संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद !